मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना, अर्ज कसा करावा ,अर्जाची प्रक्रिया माहित नाही येथे पहा

 मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 

नमस्कार मित्रानो शेतकरी राजावर तुमचे स्वागत आहे. आपला भारत देश कृषिप्रधान देश आहे.त्यामुळे शासन आपल्या शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवत असते. या योजनांचा फायदा शेतकऱ्यांना व्हायला पाहिजे असा उद्देश यामागचा असतो. आपला शेतकरी समृद्ध झाला पाहिजे, त्याला आपल्या कष्टाचे मोल मिळायला पाहिजे असा त्यामागचा हेतू असतो. अशीच एक योजना महाराष्ट्र सरकारने सुरु केली आहे. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना चला तर मग पाहूया.

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा शुभारंभ राज्य सरकारने केला आहे. या योजनेंतर्गत राज्य सरकार द्वारे महाराष्ट्रात शेती करणारे शेतकरी यांना सिंचनासाठी सोलर पंप उपलब्ध करून देणार. जुन्या डीजेल पंपांना व वीज पंपांना सोलर पंपामध्ये बदलून मुख्यमंत्री सौर कृषी योजनेद्वारे शेतकऱ्यांना सबसिडी देण्यात येईल.


मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा उद्देश जसे कि आपल्याला माहित आहे कि आजही शेतकरी आपल्या शेतामध्ये डीजेल पंप व वीज पंपाचा वापर आपल्या शेतामध्ये करतात  यामध्ये त्यांचा उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होऊन जातो. डीजेल पंप व वीज पंप शेतकऱ्यांना परवडण्यासारखा नाही. या समस्येला अनुसरून राज्य सरकारने या योजनेचा शुभारंभ केला. या योजनेंअतर्गत राज्य सरकार ९५% अनुदान देते व लाभार्थ्याला ५% रक्कम द्यावी लागते. या योजनेद्वारे सोलर पंप प्राप्त करून शेतकरी आपले उत्पन्न वाढवू शकतो व त्यांना बाजारामधून जास्त किमतीचे पंप खरेदी करावे लागणार नाही. या सोलर पंपामुले पर्यावरणाचे प्रदूषण व हानी होणार नाही. सर्वच दृष्टीकोनातून सोलर पंप उपयुक्त आहे. म्हणून या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकर्यांनी घ्यावा असे आवाहन राज्य सरकार तर्फे करण्यात आलेले आहे.   

या योजनेंअतर्गत राज्य सरकारने शेतकऱ्यांना १००००० कृषी पंप देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेला “अटल सौर कृषी पंप योजना” या नावानेदेखील ओळखले जाते. या योजनेंअतर्गत शेतकऱ्यांना पुढच्या ३ वर्षात १ लाख पंप देण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे. जे शेतकरी इच्छुक असतील ते या योजनेंअतर्गत official  website वर जाऊन online अर्ज करून  या योजनेचा लाभ घेऊ शकता.

सौर कृषी पंप योजना अनुदान :-

श्रेणी            ३ एचपी च्या लाभार्थ्याला अनुदान           ५ एचपी च्या लाभार्थ्याला अनुदान

सर्वसाधारण             २५५०० =०० (१०%)                      ३८५०० =००(१०%)

अनुसूचित जाती/ जमाती   १२७५०=०० (५%)                        १९२५०=०० (५%)

सौर कृषी पंप योजना आवश्यक कागदपत्र

१)      आधार कार्ड

२)      रहिवाशी दाखला

३)      सातबारा

४)      बँक पासबुक

५)      मोबाईल क्र.( चालू )

६)      पासपोर्ट फोटो

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अर्ज कसा करावा

इच्छुक शेतकर्यांनी अर्ज करण्यासाठी खालील पद्धतीने अर्ज करावा

१)सर्वप्रथम लाभार्थ्याने योजनेच्या official website वर जायचे आहे. तेथे एक home page उघडेल

२)या home page वर तुम्हाला Beneficiary services चे option दिसेल. त्यानंतर New Consumer च्या option वर क्लिक करा.

३)क्लिक केल्यावर तुमच्या समोर एक application form उघडेल या form मध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी व सर्व कागदपत्रांना अपलोड करा.

४)सर्व माहिती भरल्यानंतर submit या बटनावर क्लिक करा. याप्रकारे आपला अर्ज भरून पूर्ण होईल.


अर्जाची स्थिती कशी तपासावी

१)सर्व प्रथम officialwebsite वर जावे

२)home page वर गेल्यावर beneficiary services च option वर क्लिक करून Track Application status वर क्लिक करा.

३)त्यानंतर एक page उघडेल त्यावर आपला ID टाकून सर्च पर्यायावर क्लिक करा. सर्च बटनावर क्लिक केल्यार तुच्या समोर application status दिसेल.

माहिती आवडली असेल तर सर्व शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवा.

हे हि वाचा :-  स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी ( How To Prepare For Competetive Exam)  

             इंग्रजीची भीती वाटते : इंग्रजी शिकण्यासाठी महत्वपूर्णमाहिती

             Rte प्रवेशासाठी मुदतवाढ :- वाचा कधीपर्यंत आहे मुदत

            Latest BARC Recruitment 2023 ( भाभा अणु शंशोधन केंद्रामध्ये ४३७४ पदांची भरती

            महाडीबिटी पोर्टलवर अर्ज कसा करायचा माहित नाही येथे पहा  (How To Apply For   MAHADBT PORTAL)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

हि वेबसाईट सरकारी नसून शेतकर्यांना नवीन माहिती, योजना News साठी आहे .कोणत्याही स्पॅम कमेंट घेतल्या जाणार नाही.

Blogger द्वारे प्रायोजित.