राज्यात १० दिवस पावसाळ्या सारखा पाऊस कोसळणार- पंजाबराव डख
सतर्क राहावे
राज्यात १० दिवस पावसाळ्या सारखा पाऊस कोसळणार- पंजाबराव डख
दि.२४ एप्रिल ते २ मे पर्यंत सर्वांनी विजा, गारपीट, वारे यापासून स्वत:ची , पिकाची ,पाळीव प्राण्याची काळजी घ्यावी- पंजाबराव डख
पूर्व सूचना
राज्यातील सर्वांनी २४ एप्रिल ते २ मे पर्यंत दहा दिवस विजा वारे पाऊस गारपीट या पासून स्वत:ची पाळीव प्राण्यांची, हळद पिक इतर पिके यांची काळजी घावी. कारण २४ एप्रिल पासून राज्यात भाग बदलत २ मे पर्यंत पाऊस पडणार आहे तरी अंदाज लक्षात घेऊन शेतीची कामे करून घ्याव.
पूर्व विदर्भ. दि. २१,२२,२३,२४,२५, २६, २८, २९, तुरळक भागात दररोज भाग बदलत पाऊस काही ठिकाणी वारा तर कुठे गारपीट असेल.
उत्तर महाराष्ट्र दि.
२२, २६, २७, २८, २९,३० या तारखेला भाग बदलत तुरळक ठिकाणी कुठे वारे तर काही भागात गारपीट तर कुठे पाऊस पडल.
मराठवाडा.
दि २५, २६, २८, २९,३० या तारखेला भाग बदलत काही ठिकाणी गारपीट , वारा,पाऊस असेल.
दक्षिण व प. महाराष्ट्र:
दि २६, २७, २८, २९, ३० दरम्यान काही ठिकाणी गारपीट वारे विजा ,पाऊस पडेल.
कांदा आणि हळद विशेष हवामान अंदाज: २४ तारखेनंतर हळद व कांदा या पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकर्यांनी या पिकांची काळजी घ्यावी. हा पाऊस भाग बदलत जाणार आहे. म्हणजेच एकाच ठिकाणी सतत न पडता पुढे पुढे सरकत जाणार आहे.
विजा चमकत असताना झाडाखाली थांबू नका अशा इशारा पंजाबराव डख यांनी दिला आहे. शेतकऱ्यांना विनंती आहे कि त्यांनी किमान दहा दिवस आपले पाळीव प्राणी (गाय, बैल,शेळ्या, मेंढ्या) यांना शेतात न बांधता घरी बांधायला सांगितले आहे.
धन्यवाद!
Post a Comment