पुन्हा चार दिवस पावसाचे; ' छ. संभाजीनगरसह' या जिल्ह्यात पावसाचा इशारा

 पुन्हा चार दिवस पावसाचे

मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये तापमानात कमालीची वाढ झाली आहे. नागरिक उकाड्यामुळे हैराण झाले आहे. पण पुढच्या चार दिवसांमध्ये नागरिकांना दिलासा मिळणार आहे. संपूर्ण राज्यातील कमाल तापमानात उद्यापासून पुढचे ४ दिवस घट होणार आहे. अशी माहिती पुणे वेधशाळेचे प्रमुख डॉ. के.एस. होसालीकर यांनी दिली आहे.


राज्यात उन्हाचा पारा वाढत असल्याने दिवसा उन्हाचा तडाखा आणि संध्याकाळी वादळी पाऊस होत असल्याने शेती पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. याचबरोबर राज्यात वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे .यामध्ये जळगाव, धुळे, सांगली, सोलापूर, नगर, नाशिक या जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज आहे. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड, या भागात पावसाची शक्यता आहे. तसेच विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम ,यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचीरोली या भागातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.        

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

हि वेबसाईट सरकारी नसून शेतकर्यांना नवीन माहिती, योजना News साठी आहे .कोणत्याही स्पॅम कमेंट घेतल्या जाणार नाही.

Blogger द्वारे प्रायोजित.